मुंबई, २७ ऑगस्ट: ५९ व्या बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य खुल्या स्क्वॉश स्पर्धेसाठी ६९० इतक्या प्रवेशिका (एन्ट्रीज) आल्या आहेत. बॉम्बे जिमखाना येथील ग्लास-बॅक कोर्ट्सवर २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत एकूण २३ प्रकारांमध्ये (इव्हेंट्स) आपला खेळ सादर करतील. त्यात ९, ११, १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील मुले आणि मुली तसेच पुरुष आणि महिला गटाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, मास्टर्स गटाचाही स्पर्धा प्रकारांमध्ये समावेश आहे. ही स्पर्धा एसएफआरआयच्या विद्यमाने आयोजित केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *