शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी वस्तूंचे वाटप
मुंबई -ग्राहकांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त संस्थेचे मुंबई महानगर उपाध्यक्ष रमेश साहेबराव गुडेकर यांच्या वतीने विक्रोळी, भांडूप,मुलुंड विभागातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रम नुकताच विक्रोळी कन्नमवार नगरातील लोकशाहीर विठ्ठल उमप सभागृहात संपन्न झाला.कार्यक्रमास संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद निकम, राष्ट्रीय सरचिटणीस सुर्यकांत माने, कार्याध्यक्ष विजय बने, मुंबई अध्यक्ष महेंद्र कदम, राज मातंग समाज अध्यक्ष पांडुरंग सकटे, गायिका रागिणी गोडबोले, जिल्हा ग्राहक परिषद सदस्य महाराष्ट्र शासन बाबाजी नन्नवरे, समाजसेवक पांडुरंग खवले, समाजसेवक प्रवीण यादव, भांडूप महिला अध्यक्षा स्वप्ना घाडीगांवकर, विक्रोळी महिला अध्यक्षा स्वप्ना सातपुते, कार्याध्यक्ष दामोदर नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी रमेश साहेबराव गुडेकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद निकम यांनी ग्राहक हा राजा आहे. जनसेवा ही ईश्वरसेवा म्हणून काम करत असल्याचे सांगितले. सकल मातंग समाजाचे अध्यक्ष पांडुरंग सकटे यांनी एक दिवस जरी उपाशी राहिलो तरी चालेल मातंग समाजाचा विसर होता कामा नये.त्याचा विकास झाला पाहिजे याकडे लक्ष्य वेधले. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रकाशझोत टाकला.शेवटी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वही, पेन, बॅग वाटप करण्यात आले.´जागो ग्राहक जागो´ हे संस्थेचे ब्रीद वाक्य आहे असे सांगताना शिक्षण हीच खरी सेवा आहे,चला एकत्र येऊ या असा संदेश रमेश साहेबराव गुडेकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *