अपूर्वा बासूर नव्या ‘ सीईओ ‘
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी श्रीमती अपूर्वा बासूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांवर प्रशासकीय राजवट असताना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची बदली करण्यात येऊन त्यांच्या जागी खेबुडकर यांची नियुक्ती करण्यात आली. खेबुडकर यांनी १७ मार्च,२०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर जि.प.च्या निवडणुका होऊन लोकनियुक्त प्रतिनिधींचा कारभार सुरू झाला. आणि अवघ्या काही महिन्यातच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
श्रीमती बासुर या सध्या पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या पदावर कार्यरत आहेत
थेट ‘आयएएस’ असलेल्या बासुर यांची सिंधुदुर्ग जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झालेली नियुक्ती हे त्यांचे पहिलेच पोस्टिंग आहे.
