टॉप सीडेड सोहम पाठकला पुरुष एकेरीचे जेतेपद

मुंबई : गोरेगाव स्पोर्ट्स क्लब आणि बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद आणि निवडचाचणी बॅडमिंटन स्पर्धेत (२०२६) टॉप सीडेड सोहम पाठकने पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. एकतर्फी अंतिम फेरीत रविवारी त्याने दुसऱ्या मानांकित शुभम पालवर १५-९, १५-५ असा सहज विजय मिळवला.

गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथील बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या फायनलमध्ये सोहमने लौकिकाला साजेसा खेळ केला आणि शुभमवर वर्चस्व राखले. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित केतकी थिटे हिने दुसऱ्या मानांकित मायरा ओक हिचा १५-११, १५-११ असा सरळ गेममध्ये पराभव केला.

१७ वर्षांखालील मुले एकेरीमध्ये अव्वल मानांकित प्रतिम ममिहारने बाजी मारली. त्याने चुरशीच्या फायनलमध्ये जेडेन नोरोन्हावर १५-१३, ७-१५, १५-११ अशी मात केली. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात स्पृहा जोशीने ट्रॉफी उंचावली. रंगतदार अंतिम फेरीत तिने गार्गी दाभोळकर हिला १७-१५, १३-१५, १५-७ असे हरवले.

निकाल (अंतिम फेरी) – महिला एकेरी: १-केतकी थिटे विजयी वि.२-मायरा ओक १५-११, १५-११.

पुरुष एकेरी: १-सोहम पाठक विजयी वि. २- शुभम पाल १५-९, १५-५.

१७ वर्षांखालील मुले एकेरी: १-प्रतिम ममिहार विजयी वि. जेडेन नोरोन्हा १५-१३, ७-१५, १५-११.

१७ वर्षांखालील मुली: स्पृहा जोशी विजयी वि. गार्गी दाभोळकर १७-१५, १३-१५, १५-७.

00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *