केतकी थिटेला दुहेरी मुकूट

मुंबई : बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगरच्या सहकार्याने आयोजित गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद आणि निवडचाचणी स्पर्धेत (२०२६) अव्वल मानांकित केतकी थिटेने १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले. मायरा ओकवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत केतकीने अंतिम सामन्यात १५-१२, १५-१ असा विजय मिळवला. याआधी रविवारीच केतकीने महिलांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यातही मायरा हिचा पराभव केला होता.

१९ वर्षांखालील मुले गटाचे विजेतेपद प्रविथ साहूने जिंकले. अंतिम फेरीत त्याने ऋषभ गजवानीवर १६-१४, १५-५ अशी मात केली. अव्वल मानांकित हेझल जोशीने सर्वोत्तम कामगिरीमध्ये सातत्य राखत १३ वर्षांखालील मुलींच्या गटातील विजेतेपद मिळवले. हेझलने फायनलमध्ये मायरा गोराडियाचा १५-१०, १५-७ असा पराभव केला.

निकाल (सर्व अंतिम सामने) – १९ वर्षांखालील मुले: १-श्रीहान दुबे विजयी वि.२-आरव चितलांगिया १५-७, १५-६.

११ वर्षांखालील मुले: लक्ष्य गौर विजयी वि. २-अधृत सिंग १५-९, १५-९.

११ वर्षांखालील मुली: १-काव्या सरवणकुमार विजयी वि. काशी माहेश्वरी १२-१५, १५-१३, १५-१३.

१३ वर्षांखालील मुले: २-अभिमन्यू शेटे विजयी वि. १-अजिंक्य देसाई १५-१०, १५-१३.

१३ वर्षांखालील मुली: १-हेझल जोशी विजयी वि. मायरा गोराडिया १५-१०, १५-७.

१५ वर्षांखालील मुले: प्रबीर चीमा विजयी वि. अजिंक्य देसाई ११-१५, १५-७, १५-११.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *