स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने
कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी येथे आयोजित करण्यात आलेल्या १३व्या राज्यस्तरीय स्टेट गेम्स या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले तर यजमान कोल्हापूर संघाने उपविजेतेपद पटकावले. बीडला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये राज्यातील ६३० खेळाडूंनी भाग घेतला होता.
ठाणे जिल्ह्याच्या १४५ खेळाडूंनी ॲथलेटिक्स, स्केटिंग, फुटबॉल आणि क्रिकेट या स्पर्धेमध्ये सहभाग घेत सर्व खेळांमध्ये आपलं वर्चस्व राखलं. या स्पर्धेतील सर्व विजेते खेळाडू रोहतक हरियाणा येते २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्टुडन्ट ऑलिम्पिक नॅशनल गेम्स या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे महाराष्ट्राचे सचिव सुनील शिंदे यांनी सांगितले. ठाण्याच्या या सर्व विजयी खेळाडूंना प्रशिक्षक राम निंबाळकर, मनोज जाधव, राजू घुले, गणेश बागुल, किसन यादव, राजेंद्र पवार, नरेंद्र वामनोरे, ऐश्वर्या मदने, योगेश जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं.
