कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे भाजपचे सुसज्ज आणि आकर्षक ‘भाजपा भवन’ उभारण्यात येत आहे. या भवनाच्या सुरू असलेल्या बांधकामाची भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे सुसज्ज कार्यालय आणि भवन असावे, ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची संकल्पना असून, त्यानुसार कणकवलीत या भवनाची उभारणी करण्यात येत आहे. पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक बळ देण्यासोबतच कार्यकर्त्यांना विविध उपक्रमांसाठी सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या भवनाची उभारणी महत्त्वाची मानली जात आहे. ‘भाजपा भवन’ हे आगामी काळात केवळ पक्षाचे कार्यालय न राहता संघटन वाढीसाठी कार्यकर्त्यांच्या चारित्र्य निर्माणाचे केंद्रस्थान ठरेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *