आरपीआयच्या आंदोलनाला यश
केतन खेडेकर
मुंबई : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हनुमानाच्या अवतारातील असलेले चित्र जहांगीर आर्ट गॅलरी येथील प्रदर्शनामध्ये भरवण्यात आले होते. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांना हनुमानाच्या रूपात पुस्तक घेऊन आकाशात भ्रमंती करताना दाखवले दाखवले होते. याबाबत आरपीआयच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली असता त्यांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन हे हनुमानाच्या स्वरूपातील असलेले बाबासाहेबांचे पेंटिंग त्वरित उतरवले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अगदी शांततापूर्णपणे झाले असून यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हनुमानाचे रूपात दाखवणे म्हणजे फार मोठी गंभीर चूक आहे आणि ही चूक यापुढे घडणार नाही अशी ग्वाही जहांगीर आर्ट गॅलरीच्या व्यवस्थापक के जी मेनन मॅडम यांनी दिली.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महामानव असून सर्वांसाठी दैवत आहे. त्यांचा असे हनुमानाचा रूप दाखवून चित्र काढणे हे योग्य नाही. आम्ही बाबासाहेबांनी सांगितलेल्या दया आणि करुणेचा माध्यमातून शांततेने आंदोलन करून हे चित्र प्रदर्शनातून काढले असून चित्रकार राजेश केदारे यांनी देखील आपली चूक झाल्याचे कबूल केले असून माफी मागितली असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत दक्षिण मुंबईचे तालुका अध्यक्ष विशाल भाई दिवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव, कुलाबा तालुकाध्यक्ष मनोहर जाधव, जेष्ठ कार्यकर्ते डॅ.राजेंद्र जाधव, डॉ. रमेश ईपाकायला, तालुक्यातील कार्यकर्ते, वॉर्ड पदाधिकाऱ्यांसह, मुंबई प्रदेश चे सुनिल गरूड, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
