पश्चिम विभागीय खेलो इंडिया स्पर्धेसाठी किशोरी व मुली महाराष्ट्र संघ जाहीर

वैष्णवी चाफे व सुहानी धोत्रे कर्णधार

मुंबई, (क्रि. प्र. ) : भारतीय खेल प्राधिकरण, भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्यावतीने २० ते २१ मार्च या कालावधीत पश्चिम विभागीय खेलो इंडिया खो-खो लीग १४ व १८ वर्षाखालील किशोरी व मुली गटातील स्पर्धेचे आयोजन मुंबईतील ओम साईश्वर सेवा मंडळ, पेरू कंपाउंड, मनोरंजन मैदान, लालबाग येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी राज्य खो-खो असोसिएशन चे सचिव अॅड.गोविंद शर्मा यांनी महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर केले.

महाराष्ट्र किशोरी संघाच्या कर्णधारपदी सांगलीच्या वैष्णवी चाफे ची तर मुली गटाच्या कर्णधारपदी धाराशिवच्या सुहानी धोत्रे ची निवड झाली आहे. पश्चिम विभागीय खेलो इंडिया महिला खो-खो लीगसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे १९ मार्च रोजी लालबाग, मुंबई येथे राष्ट्रीय स्पर्धापूर्व सराव शिबिर होणार आहे. यंदाच्या हंगामामध्ये महाराष्ट्राच्या खो-खो संघाने राष्ट्रीयस्तरावर सुवर्णमय कामगिरी केली आहे. राष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राच्या संघांचा असलेला दबदबा हे दोन्ही संघ पश्चिम विभागीय स्पर्धेमध्येही कायम राखतील असा विश्वास राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईकनिंबाळकर, खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, सचिव अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. अरुण देशमुख यांनी व्यक्त केला आहे. संघातील सर्व खेळाडूंना राज्य खो-खो संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे संघ पुढीलप्रमाणे:
किशोरी संघ: वैष्णवी चाफे (कर्णधार, सांगली), मुग्धा वीर, मैथिली पवार, मुग्धा सातपुते, राही पाटील (धाराशिव), वेदिका तामखडे (सांगली), भवरम्मा उटगी (सांगली), श्रावणी तामखडे (सांगली), कल्याणी लामकाने (सोलापूर), धनश्री लव्हाळे (पुणे), अपर्णा वर्दे (पुणे), स्वरांजली कर्लेकर (रत्नागिरी), प्राची भुजबळ (परभणी), हेतल पाटील (जळगाव), अक्षरा चोले (बीड), संघ प्रशिक्षक अतुल जाधव, व्यवस्थापक वर्षा मोरे.

मुली संघ: सुहानी धोत्रे (कर्णधार), अश्विनी शिंदे, प्रणाली काळे, तन्वी भोसले (सर्व धाराशिव), नयन काळे, धनश्री तामखडे (दोघीही सांगली), दीपाली राठोड, पूर्वा वाघ (दोघेही पुणे), स्नेहल लामकाने, साक्षी ढेपे (सोलापूर), अथश्री तेरवणकर (मुंबई), सलोनी पवार (मुं. उपनगर), वैष्णवी भावलं (छ. संभाजीनगर), दिव्या गायकवाड (ठाणे), हर्षदा कोळी (धुळे), संघ प्रशिक्षक आकाश पाटील, व्यवस्थापक श्रीमती कविता परब.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *