मुंबई : श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने ९९ व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी वैयक्तिक संघाची स्पर्धा रविवार दिनांक ०५/०५/२०२४ ते गुरुवार दिनांक ०९/०५/२०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता संस्थेचे सर्व सभासद व खेळाडू अतोनात मेहनत घेत आहेत.
स्पर्धेचे उदघाटन रविवार दिनांक ०५/०५/२०२४ रोजी सायंकाळी ७:३० वाजता मा. श्री. विनयकुमार राठोड (पोलीस उपायुक्त ठाणे वाहतूक विभाग) यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच, स्पर्धेचा बक्षीस समारंभ व समारोप गुरुवार दिनांक ०९/०५/२०२४ रोजी रात्रौ ९:०० वाजता मा. श्री. संजय काटकर (आयुक्त मीरा-भाईंदर महानगरपालिका) यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या स्पर्धेत पुरुष गटात ६२ संघानी व महिला गटात ३० संघानी अशा एकूण ९२ संघानी भाग घेतला आहे. ह्यामध्ये पुरुष गटात गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर), बंड्या मारुती सेवा मंडळ (मुंबई शहर), स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर), ईच्छाशक्ती क्रीडा मंडळ (पालघर), श्री साई स्पोर्ट्स (नाशिक), शिव शंकर क्रीडा मंडळ (ठाणे) , मिडलाईन कर्जत (ठाणे), जय बजरंग क्रीडा मंडळ वाशिंद (ठाणे), जय बजरंग रोहा (रायगड) ह्या नामवंत संघांचा समावेश आहे. तर, महिला गटात शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब (धुळे), श्री राम कबड्डी संघ (पालघर), स्वराज्य स्पोर्ट्स अकॅडमी (चिपळूण), अमर हिंद मंडळ (मुंबई शहर) , शिवतेज क्रीडा मंडळ (ठाणे),प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन (पुणे) ह्या नामवंत संघांचा समावेश आहे.
या स्पर्धेत एकूण २,५०,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
विजेता, उपविजेत्याउपविजेत्या आणि उप उपांत्य फेरीत मजल मारणाऱ्या संघाना रोख रकमेची पारितोषिके, चषक देऊन गौरवण्यात येईल. तसेच विजेत्या संघाला ४४,४४४/-, उपविजेता : ३३,३३३/- आणि उप उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना ११,१११/- रोख रकमेची पारितोषिके देण्यात येईल. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ५,०००/- चा मानकरी ठरेल. तसेच सर्वोत्तम चढाईपटू आणि पक्कडपटू यांना प्रत्येकी ३,०००/- चे पारितोषिक मिळेल. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट चढाईपटू व पक्कडपटूला १,०००/- प्रत्येकी बक्षिस रक्कम रोख मिळेल.
