ग्रामस्थांच्या तपासणी अंती जरंडीला प्रकार उघडकीस

सोयगाव : सोयगाव च्या पुरवठा विभागाकडून जरंडी गावासाठी आलेल्या रेशनचे धान्याचे वाहनाची ग्रामस्थांसह दक्षता समितीने वाहनातील रेशनचे धान्याची तपासणी करून घटनास्थळी च धान्य मोजणी केली त्या वाहनातील तीन क्विंटल धान्य कमी भरल्या चा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे याप्रकरणी ग्रामस्थांच्या मागणी वरून ग्रामपंचायत ने पंचनामा केला आहे.

जरंडी गावात खरेदी विक्री संघाचे दुकान आहे गावातील विविध योजनेच्या ८८९ शिधापत्रिका धारक आहे त्यासाठी १२८ क्विंटल रेशनचे धान्य लागते मे महिन्यासाठी पुरवठा विभागाकडून शुक्रवारी जरंडी च्या रेशन दुकानाला सोयगाव वरून धान्य पुरवठा करण्यासाठी आलेल्या वाहनाला दुकानाजवळ येताच ग्रामस्थांसह दक्षता समितीचे सदस्त व उपसरपंच संजय पाटील यांनी हे वाहन खाली करण्याचा आधी वाहनाखाली वजन काटा लावून वाहनातील गहू तांदुळाच्या गोण्याची मोजणी केली असता प्रत्येक धान्याच्या गोणीत प्रत्येकी एक किलो याप्रमाणे धान्य कमी भरून गोनी चे वजन पन्नास किलो ऐवजी ४८ ते ४९ पन्नास किलो भरल्या मुळे २५६ गोण्या मध्ये तब्बल दोन क्विंटल पन्नास किलो व एक गव्हाची गोनी याप्रमाणे तीन क्विंटल धान्य कमी भरले असून जरंडी च्या लाभार्थ्यांच्या धान्य ला ऐन दुष्काळात कात्री लावली आहे ऐन दुष्काळात मे महिन्यात तब्बल शंभराहून अधिक कुटुंबियांना धान्य वाचून उपास मार होणार असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे ग्रामपंचायत प्रशासनाने या घटनेचा पंचनामा करून सोयगाव तहसील व खरेदी विक्री संघ यांना लेखी पत्र दिले आहे यावर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *