५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे खो-खो संघ जाहीर
मुंबई : भारतीय खो खो महासंघाच्या वतीने दिल्ली येथे २८ मार्च ते ०१ एप्रिल या कालावधीत ५६व्या पुरुष महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र खाखो असोसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा यांनी महाराष्ट्राचे संघ जाहीर केले आहेत. या संघास महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरुण देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. निवड झालेल्या खेळाडूंनी १९ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत के. के. एम. कॉलेज, मानवत जि. परभणी येथे राष्ट्रीय स्पर्धापूर्व सराव शिबिरात सहभागी व्हावे अशी सूचना सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा यांनी दिली. तसेच सराव शिबिराच्या शेवटी कर्णधारांची निवड घोषित केली जाईल असेही त्यंनी जाहीर केले.
निवड झालेल्या खेळाडूंनी मॅट शूज, आधार कार्ड व २ फोटो सोबत आणावेत. परभणी जिल्हा हौशी खो-खो असोसिएशनचे सचिव पवन पाटील यांच्याशी (मो. ७५८८५७२९९९) संपर्क साधावा.
महाराष्ट्राचा संघ खालील प्रमाणे जाहीर केले आहेत.
पुरुष गट : प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, राहुल मंडल, वृषभ वाघ, आदित्य गणपुले (सर्व पुणे),अनिकेत चेंदवणकर, ऋषिकेश मुर्चावडे, निखिल सोडीये, अक्षय भांगरे (सर्व मुं. उपनगर), दिलीप खांडवी (नाशिक), लक्ष्मण गवस (ठाणे), अक्षय मासाळ, सौरभ घाडगे (सर्व सांगली), विजय शिंदे (धाराशिव), शुभम जाधव (परभणी), राखीव : वेदांत देसाई (मुंबई), गजानन शेंगाळ (ठाणे), सुरज लांडे (सांगली). प्रशिक्षक : शिरीन गोडबोले (पुणे), सहाय्यक प्रशिक्षक : पवन पाटील (परभणी) व्यवस्थापक :अनिल नलवाडे (परभणी)
महिला गट : प्रियांका इंगळे, काजल भोर,स्नेहल जाधव,कोमल दारवटकर, हृतिका राठोड (सर्व पुणे), रेश्मा राठोड, पूजा फरगडे, किशोरी मोकाशी (सर्व ठाणे) गौरी शिंदे, संपदा मोरे, ऋतुजा खरे, अश्विनी शिंदे (सर्व धाराशिव), पायल पवार (रत्नागिरी), सानिका चाफे (सांगली) मिताली बारसकर (मुं. उपनगर). राखीव : अपेक्षा सुतार (रत्नागिरी), प्रतीक्षा बिराजदार (सांगली), निशा वैजाल (नाशिक) प्रशिक्षक : प्रवीण बागल (धाराशिव), सहाय्यक प्रशिक्षक : प्राची वाईकर (पुणे), व्यवस्थापिका : वैशाली सावंत (परभणी).