लष्करी जवान पोलिसांच्या अटकेत
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूकीतील ईव्हीएम मशिन फिक्सकरण्यासाठी एका लष्करी जवानांने ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी दानवे यांच्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर शहरात एका लष्करी जवानाला पोलिसांनी सापळा रचून अटक करण्यात आली आहे.
“मारुती ढाकणे असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये चिपच्या माध्यमातून फेरफार करण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप दानवे यांनी केला. “आरोपीच्या डोक्यावर कर्ज होतं. हे कर्ज फोडण्यासाठी त्याने पैशांची मागणी केली आहे. पण त्याला ईव्हीएमबद्दल काहीच माहिती नाही, असे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास आरोपीने अंबादास दानवे यांचे धाकटे भाऊ राजेंद्र दानवे यांची जवळच्या हॉटेलमध्ये भेट घेतली. अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे याठिकाणी झालेल्या चर्चेनंतर दीड कोटी रुपयांचा करार झाला होता, त्याने राजेंद्र दानवे यांच्याकडून टोकन रक्कम म्हणून १ लाख रुपये घेतले”, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
