सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, द्रष्टे समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त श्री. चंद्रकांत तायडे, प्रशासकीय अधिकारी श्री. उत्तम खरात व श्री. नैनेश बदले, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे आणि इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *