ठाणे : लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे, यासाठी २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू मार्केट नौपाडा परिसरात नाका कामगारा सोबत मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी परिसरातील कामगारांनी मतदान करुन आपला हक्क बजवावा, मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले.

मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. आणि २० मे को सब काम छोडो मतदान करो अशा घोषणा देत मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. कोणत्याही मतदाराला त्यांच्या मतदानाच्या लोकशाही अधिकारापासून वंचित ठेवता कामा नये आणि त्यामुळे मतदानाचा दिवस सर्वांसाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे,” लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवहान सर्व उपस्थित कामगारांना  सहायक प्रकल्प अधिकारी तानाजी सोनवलकर यांनी केले.

सदर मतदान जनजगृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या नाका कामगारांना मी मतदान करणारंच….. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा.या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *