मीरारोड- मीरा भाईंदरमध्ये गेल्या १० वर्षात खासदार म्हणून केलेल्या कामांची जनतेला कल्पना आहे. येथील जागरूक जनता यावेळी देखील आपली साथ देईल असे उद्धवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी प्रचार फेरी दरम्यान सांगितले. शनिवारी विचारे यांच्या प्रचाराची रॅली सकाळी मीरारोडच्या कनकीया येथून निघून इंद्रलोक , भाईंदर पूर्व , भाईंदर पश्चिम , मुर्धा ते उत्तन , मीरारोड येथून  रात्री पेणकरपाडा येथे समाप्त झाली.
ह्या प्रचार फेरीत काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन , भाजपाचे माजी जिहाध्यक्ष ओमप्रकाश गाडोदिया , काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत , उद्धव सेनेचे प्रकाश जैन , माजी नगरसेवक लक्ष्मण जंगम ,  दिनेश नलावडे , प्रवीण पाटील  , शर्मिला बगाजी , तारा घरांत , मच्छीमार नेते  लिओ कोलासो व बर्नड  डिमेलो आदी शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी पवार गट , आम आदमी पार्टी चे पदाधिकारी – कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी मीरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण आणि आधुनिकीकरण , वरसावे उड्डाणपूल , सूर्या पाणी योजना , मेट्रो आदी प्रमुख विकास कामांसह अन्य अनेक विकास कामे गेली १० वर्षात करून घेतल्याचे राजन विचारे म्हणाले . महाविकास आघाडीच्या प्रचार फेरीत विचारे यांनी केलेल्या कामांची माहिती नागरिकांना देण्यात आल्याचे युवासेनेचे पवन घरत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *