तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन पुरस्कार

ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालयांच्या आरोग्य सुविधांच्या दर्जा वाढावा व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या या हेतूने आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्काराने गौरविण्यात येते. 2022-23 या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
यामध्ये राज्यस्तरीय कायाकल्प प्रथम क्रमांक पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षीही ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचा ‘कायाकल्प पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचसोबत जिल्ह्यात शेणवा, शिरोशी, धसई, अनगाव, खडवली या 5 प्राथमिक आरोग्य केंद्राना उत्तेजनार्थ प्रत्येकी रक्कम रुपये 50 हजाराचे पारितोषिक मिळाले आहे.
सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन पुरस्कार
केंद्र शासनाच्या सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना द्वारे गरोदर महिला आणि नवजात बालकांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचे कामकाज करण्यात येते. यावर्षी राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी, शहापूर तालुक्यातील शेणवा, मुरबाड तालुक्यातील धसई या प्राथमिक आरोग्य केंद्रास सुमन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात व आरोग्य संस्थांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या आरोग्य सुविधांमध्ये सातत्य ठेवावे, यासाठी कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत आरोग्य संस्थांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट उपाययोजनांच्या आधारावर पुरस्कृत करण्यात येते. यामध्ये गुणांकन करण्यात येऊन निर्धारित मानक पूर्ण करणाऱ्या आरोग्य संस्थांना रोख रकमेचे पुरस्कार देण्यात येतात.
वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रास कायाकल्प पुरस्कार जाहीर आला असून या पुरस्काराची रक्कम 2 लाख रुपये आहे. इतर 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला असून या प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी, शहापूर तालुक्यातील शेणवा, मुरबाड तालुक्यातील धसई या प्राथमिक आरोग्य केंद्रास सुमन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. पुरस्कार मिळालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन. – डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *