डोंबिवली  क्रिकेट क्लब उपांत्यपूर्व फेरीत

ठाणे : डोंम्बिवली क्रिकेट क्लबने पाटण क्रिकेट क्लबचा १२४ धावांनी  दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटना आयोजित डॉ. एच. डी. कांगा बाद पद्धत क्रिकेट स्पर्धेच्या ब गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. प्रथम फलंदाजी करताना २४३ धावांचे आव्हान उभे केल्यावर सागर मिरमॉटने पाच आणि शित रंभीयाने तीन बळी मिळवत  पाटण क्रिकेट क्लबला ११९ धावांवर गुंडाळून विजयावर शिक्कामोर्तब  केले .

पाटण क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. प्रणव यादवने  ९७  चेंडूत ११३ धावांची खेळी करत डोंबिवली क्रिकेट क्लबला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. अंकित नाईकसाटमने   ४४ धावांचे योगदान दिले.  इशानने तीन  आणि चेतनने दोन बळी मिळवले. या आव्हानाचा बचाव करताना सागर  मिरमॉटने  १९ धावांत ५ बळी मिळवत पाटण क्रिकेट क्लबला धक्का दिला.  शित रंभीयाने तीन आणि सोहंम सावंतने दोन बळी मिळवत  संघाच्या विजयात योगदान दिले. पराभूत संघाकडून सौरभने २६ आणि जिगरने २५ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक : डोंबिवली क्रिकेट क्लब  : ४५ षटकात सर्वबाद २४३ ( प्रणव यादव ११३, अंकित नाईकसाटम ४४ इशान ८-३३-३, चेतन ९-३९-२,) विजयी विरुद्ध  पाटण क्रिकेट क्लब : ३० षटकात सर्वबाद ११९ ( जिगर २५, सौरभ २५  सागर मिरमॉट ७-३-१९-५, शित रंभीया ६-२३-३, सोहम सावंत ४-१९-२).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *