विकास धारियाची प्रथम मानांकित महम्मद घुफ्रानवर मात
मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ, माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, माटुंगा ( पश्चिम ) येथे सुरु असलेल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उप उपांत्य फेरीत मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारियाने स्पर्धेतील प्रथम मानांकित व विद्यमान एशियन चॅम्पियन महम्मद घुफ्रानवर सरळ दोन सेटमध्ये २५-८, १६-७ असा सहज विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.
पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे
ओमकार टिळक ( ए. के. फाउंडेशन ) वि वि सौरभ मते ( डी. के. सी. सी. ) २५-१, १८-१४
फहीम काझी ( शिवतारा कॅरम क्लब ) वि वि सिद्धांत वाडवलकर ( डी. के. सी. सी. ) ११-२२, २५-२०, २५-६
प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक ) वि वि संदीप देवरुखकर ( ओ. एन. जी. सी. ) १०-७, २५-१५
महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे
काजल कुमारी ( इंडियन ऑइल ) वि वि समिधा जाधव ( डी. के. सी. सी. ) २५-१२, २५-०
वैभवी शेवाळे ( डी. के. सी. सी.) वि वि निलम घोडके ( पी. ओ. आर. सी. ) १५-२४, २५-७, १८-१६
रिंकी कुमारी ( पी. ओ. आर. सी. ) वि वि उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक ) २५-२१, १६-२१, २५-५
अंबिका हरिथ ( रिझर्व बँक ) वि वि सेजल लोखंडे ( डी. के. सी. सी. ) २२-१४, २३-११
