मुंबई : मोहना कारखानीस, सिंगापूर लिखित ‘एका’ ही कादंबरी आणि ‘जाईचा मांडव’,व ‘पैंजण’या कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा एव्हरशाईन हॉल, ठाकूर व्हिलेज, कांदिवली पूर्व येथे करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ होते. तसेच व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मीना नाईक, प्रा. जाई म्हात्रे , कोकण मराठी साहित्य परिषदेचे ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय सैतवडेकर तसेच डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे उपस्थित होते. सूत्रसंचालन धनश्री दामले यांनी केले.
या समारंभात प्रकाश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, लता गुठे, संजीवनी समेळ, संगीता अरबुने, कौतुक मुळे, फरझाना इकबाल आणि संजय कारखानीस इत्यादी मान्यवर, साहित्यिक आणि स्नेही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *