उल्हासनगर : मनिष हिवरे हे उल्हासनगर महानगरपालिकेत तीन महत्वाच्या पदावर अधिकारी असून त्यांची एकुलती एक कन्या सौम्या हिवरे हिने 12 वीच्या परीक्षेत 95 टक्के गुणांना गवसणी घातली आहे.
विशेष म्हणजे 10 वीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवणाऱ्या सौम्याने 12 वितही 95 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.
सहायक आयुक्त प्रभाग समिती 2,सहायक आयुक्त सामान्य प्रशासन आणि सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी या तीन पदाचा पदभार मनिष हिवरे हाताळत आहेत.त्यांची कन्या सौम्या हिने 10 वि मध्ये 97 टक्के गुण मिळवून माटुंग्यातील पोद्दार महाविद्यालयात कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला आहे
मनिष हिवरे यांची पत्नी व सौम्याची आई प्रज्ञा हिवरे ह्या डबल ग्रॅज्युएट असून सौम्याच्या अभ्यासाची जबाबदारी त्या लिलया पार पाडतात.कॉलेज,क्लास आणि आई कडून घेण्यात येणाऱ्या सरावाचे चीज सौम्याने 95 टक्के गुण मिळवून करून दाखवले आहे.
सौम्या ही सी.ए करणार असून पुढे ती एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे.आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,उपआयुक्त किशोर गवस,डॉ.सुभाष जाधव,नोडल अधिकारी गणेश शिंपी,सर्व विभाग प्रमुखांनी सौम्या हिवरे हिचे अभिनंदन केले आहे.
