अशोक गायकवाड

खालापूर : मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती खालापूर आयुब तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय खालापूर येथे तालुक्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालय प्रमुखांची बैठक संपन्न झाली आपत्कालीन परिस्थितीत समन्वय महत्त्वाचा आहे, असे मत-तहसीलदार आयुब तांबोळी यांनी व्यक्त केले.

सदर बैठकीस निवासी नायब तहसिलदार खालापूर सुधाकर राठोड, सहा. गटविकास अधिकारी पंचायत समिती खालापूर सी.एस. राजपूत, उपमुख्याधिकारी नगरपरिषद खोपोली गौतम भगळे, अहगिनशमन अधिकारी, म.ओ.वि.म.पाताळगंगा आशिष मोरे, आरोग्य निरीक्षक, ता.आ. कार्यालय खालापूर प्रशांत अंबुर्ले, पोलीस उपनिरीक्षक खोपोली पोलीस ठाणे कर्मराज गावडे, पोलीस निरीक्षक, खालापूर पोलीस ठाणे एम.पी. खोपडे,पोलीस निरीक्षक रसायनी पोलीस ठाणे संजय बांगर,अशोक मोरे, कनिष्ठ अभियंता, मोरबे धरण न.मु.म.पा.,सुदर्शन आगलावे, शा.अभियंता, रा.जि.प.कर्जत, रविंद्र म्हात्रे, वनपाल, वनपरिक्षेत्र खालापूर, दिक्षांत वाघ, म.रा.वि.मर्या., खालापूर, वी.जी. आंब्रस्कर, दुय्यम निबंधक खालापूर, ङिएम. मोरखंडीकर, नगरपंचायत खालापूर, ङिके.भोईर, खालापूर पोलीस ठाणे, आर.एम.भदले, रसायनी पोलीस ठाणे, डी.बी.नाईक, ग्रामीण पाणी पुरवठा रा.जि.प. उपविभाग खालापूर, ए.जी.तेलखडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग खालापूर, श्रीम. शिल्पा दास पवार, शिक्षक विभाग पंचायत समिती खालापूर, संजय पवार, अग्निशमन पाताळगंगा,

अजित महारनूर, सां.बां. विभाग खालापूर, एस.बी.मेंगाळ, पाटबंधारे विभाग, कर्जत, गुरुनाथ साठेलकर, अध्यक्ष, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, निलेश कुडले, सदस्य, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, अमोल कदम, सदस्य, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था,महेश भोसले, सदस्य, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आदी उपस्थित होते.

सन २०२४ च्या मान्सूनपुर्व तयारी अंतर्गत तालुक्यातील दरडप्रवण पूरप्रवण, धरणक्षेत्र, तलाव, धबधबे या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

सदर बैठकीमध्ये सर्व विभागांनाप्रमुखांना आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, नियंत्रण कक्ष स्थापन करणे, अधिकारी/कर्मचारी यांची मोबाईल नंबरसह अद्यावत माहिती सादर करण्याच्या सूचना देणेत आल्या. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सर्व विभागाला त्यांचे कार्यालयातील नोडल अधिकारी यांची नेमणूक करुन, त्याची माहिती तालुका नियंत्रण कक्षात सादर करणेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विभागप्रमुखांनी विनापरवानगी मुख्यालय सोडू नये, भ्रमणध्वनी कायम सुरु ठेवण्याच्या व तालुक्यात उद्भवण्यात येणाऱ्या संभाव्य आपत्तीस तात्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले. नैसर्गिक आपत्ती सन २०२४-२५ च्या अनुषंगाने तहसिलदार कार्यालय खालापूर येथे २४x७ तास तालुका नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. खालापूर तालुका नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक: १) ०२१९२-२७५०४८ २) ८२६२८९७८८८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *