ठाणे : मुथूट एक्झिम (प्रायव्हेट) लि. ही मुथूट पप्पाचन ग्रुप (जी मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) ची मौल्यवान धातूची शाखा असून आज त्यांनी ठाण्यातील नागरिकांना उच्चतम सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे गोल्ड पॉईंट सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे ते महाराष्ट्र राज्यातील तिसरे आणि भारतातील 23 वे केंद्र बनले आहे. आजपासूनच ग्राहकांना या नव्याने उघडलेल्या गोल्ड पॉईंट केंद्राला भेट देता येईल, जिथे ग्राहकांना सोन्याच्या उच्चतम गुणवत्तेचे, वाजवी, योग्य, विशेष व किफायतशीर विक्रीचा आणि पुनर्वापर करण्याचा अनुभव घेता येईल. हे केंद्र शॉप नंबर 01, 02, तळमजला, आकाश चेंबर्स, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ठाणे गाव, ठाणे पश्चिम येथे उघडण्यात आले आहे.संस्थेने 2015 मध्ये कोईम्बतूरमध्ये पहिले गोल्ड पॉईंट सेंटर सुरु केले होते आणि तेव्हापासूनच सुरू झालेल्या मुथूट एक्झिमचा नंतर उल्लेखनीय असा विस्तार झाला, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, नोएडा, जयपूर, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुरुग्राम, म्हैसूर आणि मदुराई, या व्यतिरिक्त विजयवाडा आणि एर्नाकुलम (कोची) यांचाही समावेश आहे.
मुथूट गोल्ड पॉईंट हा मुथूट एक्झिमचा एक प्रमुख उपक्रम असून ग्राहकांना वैज्ञानिक अचूकता, स्पष्टपणा/ प्रामाणिकपणा आणि त्यांच्या गरजांवर प्राथमिक भर देणारा अतुलनीय अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सोने विकण्यासाठी विश्वासार्ह आणि किफायतशीर मिळू शकेल. सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहण्याचा दर कमी करण्याच्या उद्देशाने मुथूट एक्झिम भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत सोन्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करत आहे.
या शुभारंभाबद्दल बोलताना मुथूट एक्झिमचे सीईओ केयूर शाह म्हणाले की “ठाणे हे भारतातील एक परिपूर्ण संतुलित महानगर म्हणून विकसित झाले आहे. ठाणे हे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या जवळ आहे.मुथूट पप्पाचन ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मुथूट एक्झिमचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस मुथूट यांनी या शुभारंभाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हणाले की “आम्ही राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याची योजना आखत असताना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची खात्री करून आमच्या गोल्ड पॉईंट सेंटर्सच्या मदतीने ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना एक अनोखी आणि सर्वसमावेशक सुविधा प्रदान करत आहोत.मुथूट पप्पाचन ग्रुप बद्दल थोडक्यात 1887 मध्ये स्थापन करण्यात आलेली मुथूट पप्पाचन ग्रुप (MPG) ही देशव्यापी झाली. मुथूट पप्पाचन फाऊंडेशन म्हणजेच समूहाची CSR शाखा आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि उपजीविका (HEEL) यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या संपूर्ण समूह कंपन्यांसाठी CSR उपक्रम राबविण्याचे काम करते.
