मुरबाड : मुरबाड तालुक्यातील नागरिकांसाठी मुरबाड शहरात गेली तीन वर्षे डोळ्यांच्या समस्यांसाठी दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणारे नामांकित इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मुरबाड भिवंडी लोकसभा मतदारसंघ मतदानाचा हक्क बजावणाऱ्या सतर्क नागरिकांसाठी  मोफत नेत्र तपासणी अभियान राबवले जाणार आहे.

तरी सदर अभियानात भिवंडी लोकसभा क्षेत्रातील तसेच विशेष करून मुरबाड तालुक्यातील नागरिकांनी परिपूर्ण नेत्र तपासणी करून मोतीबिंदू बद्दल मार्गदर्शन व माहिती घ्यावी तसेच या अभियाना मार्फत अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्म्यांवर १०% सवलत देण्याचे  आश्वासन इन्फिगो आय केअर हॉस्पिटल चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी दिले असून सदर  अभियानात नागरिकांनी  मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून संधीचा लाभ घ्यावा व नेत्र तपासणी येताना  माहिती पत्रक किंवा आपले मतदान कार्ड सोबत घेऊन येणे. असे आव्हान इन्फिगो आय केअर मुरबाड चे केंद्रप्रमुख रोहित झुंजारराव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *