बुद्ध जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष संजय थोरात यांचे प्रतिपादन !
मुरबाड : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आज मुरबाड येथे २५६८ व्या बुद्ध जयंती निमित्ताने शांती संदेश मार्च व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
मुरबाड मधील तोंडलीकर नगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पर्यंत रथातून बुद्ध मूर्तीची भव्य मिरवणूक काढून शांती संदेश मार्च काढण्यात आला. याप्रसंगी मुरबाड तालुक्यातील अनेक बौद्ध उपासक उपासिका सामील झाले होते. बुद्धम् शरणम् गच्छामि च्या निनादाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता.
शांती यात्रेचे रूपांतर पुढे अभिवादन सभेमध्ये झाले. अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे अध्यक्ष संजय थोरात हे होते. संजय थोरात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी अनेक संकल्प बोलून दाखवले मुरबाड मध्ये भव्य बुद्ध विहाराची निर्मिती तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालय येत्या काळात निर्माण करू असे प्रतिपादन त्यांनी केले. अभिवादन सभा तथा धम्मदेसनेसाठी उपस्थित असलेले भदंत महामोग्गलायन, भदंत वफ्फ,भदंत संघपाल , भदंत धम्मप्रिय व धम्मदुत सारवन्ता थोरकिर्ती (अनागारीका) हे उपस्थित होते . भन्ते महा मोग्गलायन यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात देसना देत सांगितले की स्वतःमध्ये त्याग वृत्ती निर्माण करूनच क्रांतिकारक बदल करता येईल. सदर प्रसंगी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात, काम करणारे भगवान पवार, रवींद्र चंदने,रवींद्र देसले ,दादासाहेब शिंदे ,कैलास देसले, यशवंत भालेराव, ठोसरे गुरुजी ,उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा सरचिटणीस किसन रातांबे व दिलीप धनगर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पुरुष व महिला कार्यकारीणी यांनी विशेष मेहनत घेतली.
यामध्ये संजय थोरात ,किसन रातांबे, भाऊ खोळंबे ,भगवान देसले ,प्रवीण भालेराव, पुंडलिक चंदने, दादासाहेब शिंदे, विजय खोळंबे, रघुनाथ थोरात, लक्ष्मण बनसोडे ,उत्तम थोरात ,दिलीप धनगर, नागेश थोरात, शाम थोरात, दत्तात्रय थोरात, मारुती गायकवाड ,सुरज भालेराव, मधुकर थोरात, भीमराव भोईर, योगिता खंडागळे, ज्योती अहिरे, शोभा अहिरे, ज्योती थोरात, साधना आहिरे, रंजना शिंदे, गीता जाधव, स्नेहा भालेराव, तेजा खंडागळे ,मेघा साटपे ,मनीषा भवार ,सविता भोईर, अस्मिता वाळंदे, अर्चना भालेराव, दीपा धनगर, मीनल भवार ,नमिता भवार, सविता भालेराव, प्रियंका थोरात, सुषमा भवार, आदी सर्व कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.
