मुंबई: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी अखेर निवडणूक आयोगाला मुहुर्त मिळाला आहे. विधानपरिषदेच्या दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी आता २६ जूनला मतदान होणार आहे. तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

यापुर्वी १० जून ही ताऱीक निवडणूक आयोगाने घोषित केली होती. परंतु सात टप्यातील लोकसभेच्या निवडणूकीचा निकाल ४ जूनला संपणार आहे. तसेच सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने १० जून रोजी राज्यातील बहुतांश सर्वच शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा शिक्षक संघटनांचा दावा होता. त्यामुळे, ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत होती. निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य केली होती.

मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे.

मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम

31 मे 7 जून पर्यंत अर्ज भरणार
10 जून रोजी अर्जाची छाननी
12 जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार
26 जून रोजी मतदान होणार
1 जुलै रोजी होणार मतमोजणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *