ठाणे रेल्वेस्थानकावरील धक्कादायक दुर्घटना
अनिल ठाणेकर
ठाणे: शिवाजी मंदिरमधिल मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्य कामास असणाऱ्या जनग जंगलेचे भावविश्व मोबाईल चोरट्यामुळे उद्धवस्त झाले आहे. कामावरून दादर कल्याण ट्रेनने घरी जात असताना ठाणे स्टेशनजवळ मोबाईल चोरट्यांनी लोकलच्या दारात उभ्या असलेल्या जंगलेच्या हातावर काठी मारल्याने त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. आणि त्यानंतर पायावरून रेल्वे गेल्याने त्याचे दोन्ही पाय कापले गेले. नशिब बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला.
२२ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानक फलाट क्रमांक २ च्या आसपास ही घटना घडली. ३१ वर्षीय जगन लक्ष्मण जंगले हे अशोकवन, चाळ क्रमांक ७, रूम नंबर ५, विजय नगर, अमराई, कल्याण पूर्व येथे राहतात. मॅजेस्टिक बुक स्टॉलमधिल काम आटपून ते रात्री ९ च्या सुमारास दादर स्टेशन वरून घरी परतत असताना हा अपघात घडला. कल्याण लोकलच्या दरवाजाजवळ जंगले उभे होते. यावेळी मोबाईल चोरीच्या उद्देशाने जगन जंगले यांच्या हातात असलेल्या मोबाईलवरील हातावर चोरट्यांनी जोरात फटका मारला. हा फटका इतका जोरात होता की जंगले यांचा तोल गेला व ते रेल्वे डब्यातुन खाली पडले. यावेळी धावती रेल्वे जंगले यांच्या दोन्ही पायावरुन गेली. नशीब बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले. ठाणे फलाट क्रमांक २ नंबर पासून अंदाजे २०० मिटर पुढे (कळव्याच्या दिशेने), सिडको बस स्टॉप च्या जवळील रेल्वे ब्रिजवर ही घटना घडली. अपघाताची सुचना मिळताच ठाणे फलाटावरील रेल्वे पोलीस व कर्मचारींनी तत्परता दाखवित त्यांना रुग्णालयात दाखल केले. जंगले यांच्यावर ठाणे येथील हायलॅण्ड हॉस्पिटल या इस्पितळात दोन्ही पायावर शस्त्रक्रीया करण्यात आली. जगन जंगले यांचे प्राण वाचले असले तरी मोबाईल चोरीच्या घटनेत त्यांचे दोन्ही पाय मात्र कायमचे गेल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. तीनच महिन्यापुर्वी त्यांचे लग्न झाले होते. मॅजेस्टिक बुकमध्ये कामाला असल्याने साहित्यविश्वात जंगले परिचित आहे. त्याच्या अपघाताच्या वृत्तान साहित्यविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पुडील आयुष्य अपंग म्हणूनच जगन जंगले यांना जीवन कंठावे लागणार आहे. जगन जंगले यांच्या घटनेवरुन बोध घेऊन तरी ठाणे रेल्वे पोलीसांनी सतर्क राहून रेल्वे फलाटावरील मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करावा व प्रवाशांची सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी रेल्वे प्रवाश्यांची मागणी आहे.
