पनवेल : मुंबईचा १४ वर्षांखालील मुलांचा संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या ड्रीम ११ चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी धैर्य किशोर पाटील याच्या शतकी (१०७ धावा) खेळीमुळे सुनील गावस्कर संघाने दिलीप वेंगसरकर संघाविरुद्ध आपल्या पहिल्या डावात २७७ धावांची मजल मारली. धैर्यने आपल्या शतकी खेळीदरम्यान १६३ चेंडूंचा सामना करताना १६ चौकार आणि एक षटकार मारला. धैर्य हा पनवेल तालुक्यातील कोपर गावचा असून उलवा नोड मधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील आयथिन्क स्पोर्ट्स अकँडमी आणि चेंबूर येथील अचिव्हर क्रिकेट अकँडमी मध्ये क्रिकेटचे धडे घेत असून धैर्य हा सुनील गावस्कर संघाचा कर्णधार आहे.
