ठाणे महानगरपालिकेच्या वतीने, माजी पंतप्रधान, भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी.जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी, महापालिकेचे विधी सल्लागार मकरंद काळे, सहाय्यक आयुक्त (लोकमान्य नगर-सावरकर नगर प्रभाग समिती) भालचंद्र घुगे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर, उथळसर प्रभाग समितीत, आंबे-घोसाळे तलावाशेजारी असलेल्या पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
