28 मेपर्यंत करता येईल पदवीधर मतदार नोंदणी

ठाणे : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे 28 मे 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची मतदार नोंदणी करावयाची आहे. तरी जिल्ह्यातील अद्यापही नोंदणी न केलेल्या पात्र पदवीधारकांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, असे  आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्चना कदम यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने 24 मे 2024 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मुदत दि.7 जुलै, 2024 रोजी समाप्त होणार आहे.

या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे :-

निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दी करण्याचा दिनांक 31 मे, 2024 (शुक्रवार),

नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक 7 जून, 2024 (शुक्रवार),

नामनिर्देशनपत्रांची छाननी दि.10 जून, 2024 (सोमवार),

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 12 जून 2024 (बुधवार),

मतदानाचा दिवस 26 जून 2024 (बुधवार) आणि मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजता,

मतमोजणीचा दिनांक 1 जुलै 2024 (सोमवार),

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 5 जुलै 2024 (शुक्रवार).

दि. 24 मे 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संबंधित मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नमुना नं. 18 भरुन सादर करावयाचा आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दि. 28 मे, 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची मतदार नोंदणी करावयाची आहे. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने करण्याची (de-nova) असल्याने सर्व पात्र उमेदवारांनी नव्याने नमुना क्र. 18 भरणे आवश्यक आहे. ही मतदारयादी नव्याने तयार करावयाची असल्याने जुन्या यादीत जरी आपले नाव असले तरीही नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. नमुना नं. 18 हस्तलिखित / टंकलिखित किंवा खासगीरित्या छापलेले अर्ज देखील स्वीकारले जातील.

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पदवीधर मतदारास नमुना नं.18 पुढील ठिकाणी सादर करता येईल

1) संबंधित तहसिलदार कार्यालय / उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय किंवा 2) मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://gterollregistration.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *