कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकासाठी आचारसंहिता भंगासंदर्भात

ठाणे : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक – 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेसंदर्भात तक्रारींसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) तथा आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख रोहितकुमार राजपूत  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघांतर्गत ठाणे जिल्हा क्षेत्रात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत प्राप्त तक्रारींसाठी तळ मजला, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे अहोरात्र 24 X 7 ‘नियंत्रण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाकडे ‘लेखी तक्रारी’ किंवा ‘टोल फ्री क्रमांक 18008911350’ वर नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदविता येतील, असे कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2024, ठाणे जिल्हा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) तथा पथक प्रमुख, आदर्श आचारसंहिता रोहितकुमार राजपूत यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *