अशोक गायकवाड
पनवेल : पनवेल विधानसभा मतदार संघातून मतांची निर्णायक आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे अभिनंदन केले. तर मताधिक्य दिल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांचा सुमारे ९६ हजार ६१५ मतांनी पराभव केला. त्या अनुषंगाने खासदार श्रीरंग बारणे यांना पनवेल विधानसभा मतदार संघातून मतांची निर्णायक आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे अभिनंदन केले. तर मताधिक्य दिल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, अभिषेक पटवर्धन, केदार भगत, रुपेश नागवेकर आदी उपस्थित होते.
