मुंबई : महानगर गॅसच्या वायूवाहिनीला होणारे नुकसान टाळण्यासाठी ‘डायल बिफोर डिग’ म्हणजेच खोदण्यापूर्वी सूचना द्या, हा उपक्रम महानगर गॅसने सुरू केला आहे.
महानगर गॅसतर्फे महामुंबई परिसरात स्वयंपाकघरात लागणारे पीएनजी तसेच वाहनांचे इंधन असलेला सीएनजी वायू पुरवला जातो. हा पुरवठा अखंड राहावा, यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरात आढळलेल्या कोणत्याही नियोजित खोदकामाची माहिती-तक्रार महानगर गॅसकडे करावी. ज्यामुळे वायू वाहिनीचे अपघाती नुकसान टळेल, त्यामुळे वायू गळती होणार नाही किंवा घरांना नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित होणार नाही. तसेच संभाव्य सुरक्षा धोके टाळणार असल्याचे म्हटले आहे. खोदकामाची माहिती महानगर गॅसला खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
