इतिहास संकलक आप्पा परब

ठाणे : १६४२ ते १६७० दरम्यानच्या २८ वर्षांत शिवरायांची राजधानी घाटमाथ्यावर होती़  नंतर ती कोकणात (रायगड) नेली़ १४ जानेवारी शिवरायांचा पहिला राजाभिषेक झाला़ नंतर दुसरा आणि तिसरा १६७४ मध्ये झाला़ राजाभिषेकासाठी शिवराय विरासनात बसले़ ज्या आसनावर राजाभिषेक विधीवत संपन्न झाला़ त्या आसनावर आसनस्थ होण्यापूर्वी शिवरायांनी बैलाचे, वाघाचे , सिंहाचे आणि बोक्याचे कातडे आंथरले होते़  आज सघ्य शिखरीच्या राजाचा ३५० वा श्री. शिवराजाभिषेक स्मृती सोहळा ठाण्याच्या संकृति परिवार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शतायुषी-सेवाभावी श्री आनंद भारती समाजाच्या सभागृहात साजरा होत आहे, याचा मला अभिमान वाटतो, असे मनोगत ७५ वर्षीय जेष्ठ  इतिहास संकलक आप्पा परब यांनी व्यक्त केले. गु्रूवारी सकाळच्या सत्रात हा सोहळा  संपन्न झाला.

संकृति परिवार सामाजिक संस्थेने आप्पा परब यांचा ‘‘जिवन गौरव ’’ पुरस्काराने डॉ. सच्चिदानंद शेनडे यांच्या हस्ते सत्कार केला. या प्रसंगी सौ. अनुराधा  परब, सुकन्या शिल्पा परब, कार्यवाहक सविता कावले, संयोजक विनोद ढगे, सुधाताई ढगे आदी मान्यवर उपास्थित होते .

उत्त्तरार्धात पुष्पा ताई लेले संचालित शिवस्तुतीवर आधारित स्वरसंवादिनी भजनी मंडळाने वीर गीतांचा संगीत कार्यक्रम व श्री आनंद भारती मार्गावरुन संवाद शिवप्रतिमा पालखी मिरवणुक काढण्यात आली. शिवप्रेमीचा उत्स्फुर्त प्रतिसाद साडेतीनशेव्या श्री शिवराजाभिषेक स्मृती सोहळ्यास लाभल्याबदल श्री आनंद भारती समाज  संस्थेचे कार्यवाहक विवेक मोरेकर व संस्कृति परिवारातर्फे विनेाद ढगे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *