ठाणे : महावितरणाच्या नवीन सबस्टेशन उभारणीसाठी मंजूर निधी झालेला त्वरित संबंधित विभागाला वर्ग करावा यासाठी पाॅवर हाऊस कार्यालयातील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आ. संजय केळकर यांची भेट घेतली. आ. संजय केळकर यांनी याबाबत संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले.
ठाण्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटल येथील जागेवर महावितरणाच्या नवीन सबस्टेशन उभारणी संदर्भात निधी मंजूर झालेला आहे तो त्वरित संबंधित विभागाला वर्ग करावा जेणे करून पुढील कामात सुलभता येईल व काम लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल या करिता पाॅवर हाऊस कार्यालयातील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आ. केळकर यांची भेट घेतली.
यावेळी ठाण्यात सबस्टेशन मिळण्याकरिता अधिकाऱ्यांनी विनंती केली. आ. संजय केळकर यांनी याबाबत संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले. यावेळी माजी नगरसेवक सुनेश जोशी, महावितरणचे अधिकारी श्री. म्हसणे व श्री. सावरकर यावेळी उपस्थित होते.
