उल्हासनगर :  उल्हासनगर येथील नागरिकाना गेल्या चार ते पाच दिवसापासुन दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी पिवळ्या रंगाचे असुन नागरिक हे पाणी पित असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रध्न उभा ठाकला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने या बाबत ताबडतोब लक्ष घालुन दुषित होत असलेला पाणी पुरवठा थांबवावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत .

उल्हासनगर शहराला पाणी पुरवठा करणारी उल्हासनदीच सध्या प्रदुषित झाली आहे. उल्हासनदीतील ज्या पंपिंग स्टेशन मधुन पाणी ओढन्यात येते,  त्याच पहिले खेमानी नाल्यातील दुषित सांडपाणी हे उल्हासनदीत जावुन मिळते . सोबतच

उल्हास नदी ही जलपर्णी ने सुध्दा  प्रदुषित झाली आहे. सध्या आता नुकतीच पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे नळाद्वारे येणारे  दुषित पाणी गरम करुन पिण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

उल्हासनगर शहरात पाण्याच्या जलवाहिन्याना गळती सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान नदीतील दुषित पाणी ,तसेच मलमुत्र युक्त पाणी हे नळाद्वारे येत आहे.

दरम्यान गेल्या चार ते पाच दिवसापासुन नळाद्वारे पिवळे पाणी येत असुन नागरिकांवर तेच पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येन पावसाच्या तोंडावर असा दुषित पाण्याचा होत असलेला पाणी पुरवठा नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरणार  आहे. याबत उल्हासनगर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता परमेश्वर बुगडे यांना माहीती घेण्यासाठी फोन केला असता त्यांचा फोन बंद होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *