राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
भाईंदर : येथे नुकत्याच झालेल्या बालयोगी श्री सदानंद महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत स्वस्तिक क्रीडा मंडळाने विजेतेपदाचा मान मिळवला. स्वस्तिकने उपांत्यफेरी मध्ये ओवळी क्रीडा मंडळाचा आरामात पराभव केला. तर अंतिम सामन्यामध्ये त्यांनी जय बजरंग वासिंद संघाला ३४ विरुद्ध २० अशा गुणांनी एकतर्फी लढतीत सहज मात दिली. स्पर्धेमध्ये अंतिम सामन्याचा मानकरी आकाश रुडेले यांची निवड करण्यात आली. संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून राज साळूंखे याची निवड करण्यात आली.
या हंगामातील सर्वाधिक राज्यस्तरीय स्पर्धा स्वस्तिक क्रीडा मंडळाने जिंकल्या आहेत. त्यांनी सलग तीन स्पर्धेमध्ये अंतिम विजय मिळवून एक विक्रम स्थापन केला आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक निलेश शिंदे सर , व्यवस्थापक सुरेश मोरे, आणि सर्व खेळाडूचे खास अभिनंदन मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
