ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील वाऱ्याने हलणारे होर्डिंग तत्काळ काढण्यात येणार आहे. त्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. तसेच, महापालिकेने होर्डिंग मालक आणि जागा मालक यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर, या होर्डिंगच्या नव्याने प्राप्त झालेल्या स्थिरता प्रमाणपत्राची (स्टॅबिलिटी रिपोर्ट) छाननी करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे.
सेवा रस्त्यावरील मुक्ता अडर्व्हटायझिंग कंपनीकडे असलेले होर्डिंग वाऱ्याने हलत असल्याची तक्रार आल्यानंतर तेथे जाहिरात विभाग उपायुक्त दिनेश तायडे, उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यासह महापालिकेच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनंतर, कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी हे होर्डिंग काढले जात आहे. तसेच, जागामालक व होर्डींग कॉन्ट्रॅक्टरला नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.
00000
