ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म करा. २ च्या विश्रांती कक्षाच्या बाहेर कचरा आणि रेती व खाडी च्या रोड्याने भरलेल्या गोण्यांचे ढीग तसेच पडलेले आहे प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.
गेले काही दिवस विविध बांधकामे, दुरुस्त्या आणि अस्वच्छतेमुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ च्या बाहेर कचऱयाच्या ढिगाचे रूप आले आहे. फलाटांवर आणि स्थानकाबाहेर गोण्यांमधील राडारोडा, पावसामुळे स्थानक परिसर चिखलमय झाला आहे. तर, पादचारी पूल, विश्रांतीगृह आणि तिकीट खिडक्या लगत गर्दुल्ले, भिक्षेकरुंनीठाण मांडल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बांधकामातील टाकाऊ साहित्य (राडारोडा) स्थानक परिसरात गोण्यांमध्ये भरून ठेवण्यात आला आहे. फलाट क्रमांक दोनजवळील विश्रांती कक्षाच्या मागील बाजूस राडारोड्याने भरलेल्या गोण्यांचा ढीग रचण्यात आला आहे. याच भागात विटा, खडी इतरत्र विखुरलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळून प्रवासी तिकीट घराच्या दिशेने जातात. सध्या राडारोड्याच्या गोण्या प्रवाशांसाठी अडथळा ठरू लागल्या आहेत. रविवारी झालेल्या पावसामुळे स्थानक भागात पाणी तुंबले होते. त्यातून सध्या प्रवाशांना वाट काढावी लागत आहे.
