अनिल ठाणेकर

ठाणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेने कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.
ठाणे जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या या पत्रकात म्हटले आहे की, कोकण विभागीय क्षेत्रात राहणारे व ज्यांची  कोकण पदवीधर मतदार संघाचे यादीत नावे आहेत अश्या सर्व निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस बांधवांना संघटनेतर्फे विनंती करण्यात येत आहे की, श्री डावखरे निरंजन वसंत हे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे आहेत. श्री. डावखरे निरंजन वसंत  हे आपले सर्वांचे खास मित्र व परिचयाचे असून ते पोलिसांना सतत मदत करीत असतात. ते या क्षेत्रात महान कार्य करीत आहेत. तरी कोकण परिसरातील नोंदणी झालेले सर्व पदवीधर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी बुधवारी, २६ जुन २०२४ रोजी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण पदवीधर मतदारसंघातुन उमेदवार असलेले श्री. डावखरे निरंजन वसंत यांच्या नावासमोरील प्रथम क्रमांकाचा 1 आकडा टाकून त्यांना बहुसंख्य मतांनी निवडून द्यावे, अशी विनंती संघटनेचे  सल्लागार सोपानराव महांगडे, काशीनाथ कचरे, राजाभाऊ तांबट, मोतीलाल जाधव, अध्यक्ष माधव माळवे, कार्याध्यक्ष  रघुनाथ घरटे, सचिव व खजिनदार बाळासाहेब दंडवते आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *