प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा अजब तर्क

मुंबई : भाजापाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून अजित पवारांना महायुतीत घेतल्यामुळेच पराभव झाल्याची तर्कसंगत मांडणी करण्यात आली होती. पण भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी आज अजब तर्क देत ऑर्गनायझरलाच खोटे ठरवले. लोकसभा निवडणूकीत भाजपाचा दारूण पराभव हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे झाला नसून त्यांच्यामुळे उलट पक्षाचा फायदाच झाल्याचे म्हटले आहे.

पण प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे भाजपने महायुतीमध्ये अजित पवार यांचाही समावेश करुन घेतला होता. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांत महायुतीला 45 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावाही भाजप नेत्यांनी निवडणुकीत केला होता. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गरज नसताना, महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही सोबत घेतल्यामुळे आर्गनायजर या मासिकातून भाजपवर टीका करण्यात आली होती. ऑर्गनायझर या मासिकात संघाचे स्वयंसेवक रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे. महाराष्ट्रात अजित पवारांसोबत हातमिळवणी आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजपला झटका बसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप आणि शिदेंकडे आवश्यक बहुमत असूनही अजित पवारांशी हातमिळवणी का केली, असा सवालही रतन शारदा यांनी लेखातून विचारला आहे. त्याच संदर्भाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना अजित पवार यांच्यामुळे आमची मतं वाढल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांना घेऊन भाजपचं कोणतही नुकसान झालेलं नाही. याउलट २०१९ च्या तुलनेत भाजपची मतं वाढली आहेत, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मात्र, २०१९ च्या तुलनेत जागा कमी झाल्या हे सत्य आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीतील लोक हरल्यावर ईव्हीएमला दोष देतात. मात्र, जिंकलेल्या असतील तिथे ईव्हीएमवर संशय का घेत नाहीत, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *