कल्याणमधील शाळा-कॉलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा
अनिल ठाणेकर
ठाणे : कोकणातील प्रत्येक शाळा ग्रीन स्कूल करणार, स्पर्धा परिक्षेसाठी उत्तम व नेमके मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रयत्न करणार, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार, असे वचन कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार आ. निरंजन डावखरे यांनी कल्याणमधील शाळा-काॅलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या सभेत बोलताना दिले.
व्हिजन डाॅक्युमेंट अंतर्गत मिशन एज्युकेशनुसार नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ग्रीन स्कूल, डिजिटल रुम आणि रोबोटिक्स लॅब सुरु करणार, जिल्हानिहाय स्पर्धा परिक्षेसाठी ग्रंथालय, संगणक, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणार, राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आ. निरंजन डावखरे यांनी कल्याणमधील शाळा-काॅलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या सभेत बोलताना स्पष्ट केले. तसेच मतदान करताना बॅलेटपेपरवर होणाऱ्या मतदानात, ‘डावखरे निरंजन वसंत’ या नावासमोरील व छायाचित्रासमोरील रिकाम्या चौकटीत, चौकटीला स्पर्श न करता एक उभी रेष (౹) मारुन बॅलेटपेपरला उभी घडी मारावी, असे आवाहन आ. निरंजन डावखरे यांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाला केले.
कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांनी कल्याण शहरातील, श्री वाणी विद्यालय-कल्याण पश्चिम, गुरुनानक स्कूल-कल्याण पश्चिम, नूतन हायस्कूल-कल्याण पश्चिम, ओक हायस्कूल- कल्याण पश्चिम अचीवर्स कॉलेज-कल्याण पश्चिम, नूतन ज्ञान मंदिर-कल्याण पूर्व, आयडियल स्कूल अँड कॉलेज-कल्याण पूर्व आदी शाळा-काॅलेजमधून प्रचार दौरा केला. या दोऱ्याच्या निमित्ताने झालेल्या सभांमध्ये मोठ्यासंख्येने उपस्थित राहून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने आपला पाठींबा निरंजन डावखरे यांना व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील, सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, कल्याण पुर्व भाजपा शहराध्यक्ष संजय मोरे,भाजपा शिक्षक आघाडी प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य एन.एम.भामरे, शिक्षक आघाडी कल्याण डोंबिवली महानगर संयोजक सुभाष सरोदे, सहसंयोजक अनिरुद्ध चव्हाण, शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभागाध्यक्ष प्रशांत भामरे, देसले, अर्जुन उगलमुगले, चंद्रकांत ठाकूर, भास्कर नारखडे, बाळकृष्ण जगे, दीपक राजपूत, सुधाकर ठोके, प्रमोद चौधरी, गोकुळ गवळे, सचिन निकम, तेजनारायान सिंह, वीरेंद्र तिवारी, नितीन मुंडे आदी भाजप शिक्षक आघाडी, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
