अशोक गायकवाड

रायगड : आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली, गांजा या अंमली पदार्थाची वाहतुक होणार आहे अशी माहिती मिळाल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने तळोजे, नवी मुंबई येथे पाळत ठेवून १२ जून २०२४ रोजी सांयकाळी छापा टाकून कारवाई केली.आरोपींच्या ताब्यातून एकुण १ कोटी १३ लाख ९० हजार रुपये किमतीचा गांजा, वाहन व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करून गुन्हयाच्या पुढील तपासासाठी अटक करण्यात आली आहे. आरोपीविरूध्द एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये. कलम ८ (क), २० (ब) (II), २९ तसेच भा. द. स. कलम ३२८ अन्वये त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजुस स्टार वेल्डींग वर्कसच्या समोर, तळोजे पाचनंद, से. नं. ४०, तळोजे, नवी मुंबई येथे गांजा या अंमली पदार्थाचा मोठासाठा वाहतुक होणार आहे अशी कार्यालयास माहिती मिळाली. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या भरारी पथक क्रमांक २, पनवेल यांनी मिळालेल्या माहितीनुसार पाळत ठेवून १२ जून २०२४ रोजी सांयकाळी छापा टाकला. यावेळी एक महिन्द्रा कंपनीची एक्सयूव्ही ५०० गाडीमध्ये दोन आरोपी आरिफ जाकीर शेख वय २५ वर्षे रा. रूम नं. १२, तळ मजला, ब्लॉक नं. ए ७८, कोकरी आगर जवळ म्हाडा चाळ सायन कोळीवाडा मुंबई व परवेझ बाबुअली शेख वय २९ वर्षे रा. रूम नं. १३, तळ मजला, ब्लॉक नं. ए ७८ कोकनी आगर जवळ म्हाडा चाळ सायन कोळीवाडा मुंबई यांच्या ताबे कब्जात पांढऱ्या रंगाच्या नायलॉन गोण्यामध्ये ४१४ किलो अं. १ कोटी रूपयांपेक्षा जास्त किमंतीचा गांजाचा साठा मिळून आला. या गुन्हयामध्ये अंतरराज्यीय टोळी असण्याची दाट शक्यता असून ही कारवाई करताना डॉ. विजय सुर्यवंशी (भा. प्र. से.) आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, प्रसाद सुर्वे संचालक (अ. व. द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदिप पवार उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग ठाणे, आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी. सी. लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी. निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, तसेच सहा. दु. नि. जी. सी. पालवे, महिला जवान आर. डी. कांबळे, . निशा ठाकुर, जवान ज्ञानेश्वर पोटे, सचिन कदम, हे सहभागी होते. गुन्हयाचा पुढील तपास आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *