अनिल ठाणेकर

 

ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि पारसिक वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, दत्तवाडी, कळवा येथे आयोजित केलेल्या मोफत दाखले वाटप शिबीरात ६७२ नागरिकांनी विविध दाखल्यांचा लाभ घेतला असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि पारसिक वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १६ जून, २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, दत्तवाडी, कळवा येथे मोफत दाखले वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १) रहिवासी दाखला, २) अधिवास (डोमेसाईल दाखला), ३) उत्पन्नाचा दाखला आणि ४) ज्येष्ठ नागरिक दाखला असे ६७२ विविध दाखले नोंदविण्यात आले. या मोफत दाखले वाटप शिबीराचा नागरिकांनी मोठ्याप्रमाणात लाभ घेतला, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे.
यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, उमेश पाटील, विजया लासे,  मंगला कळंबे, राजेंद्र साप्ते, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, प्रदेश युवक उपाध्यक्ष आदित्य धुमाळ,
विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, परिवहन सदस्य नितिन पाटील, मोहसीन शेख, युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हुसेन मणियार, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी, कार्याध्यक्ष कुणाल साबळे, वैद्यकीय आरोग्य कक्ष कार्याध्यक्ष रोहन जाधव, कार्यकारिणी सदस्य दीपक पाटील, दिनेश बने, सुनिल पाटील, पल्लवी गिध, मयूर आरोटे, युवक पदाधिकारी रोहित रायकर, शहबाज चेऊलकर, संदीप शिंदे, नासीर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *