ठाणे : केलेली कामे पूर्णत्वास नेली असल्याचा अहवाल ‘कर्तवपथा’तुन मांडण्यात आला आहे तर पुढील काळातील वचन पूर्ण करण्यासाठी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ प्रकाशित करण्यात आल्याची माहिती, ठाणे शहरातील विविध शाळा कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाशी संवाद साधताना कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार निरंजन डावखरें यांनी दिली.
येणाऱ्या सहा वर्षाच्या काळासाठी महत्वाकांक्षी व्सिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. या व्हिजन डाॅक्युमेंटमध्ये मिशन एज्युकेशन नुसार विद्यार्थी, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाची पावले ओळखून नवीन शैक्षणिक धोरण आखले आहे. हायस्पीड इंटरनेट, डेटा व्यवस्थापन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनो आणलेल्या क्रांतीचे आव्हान पेलण्यासाठी कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला लाभ मिळावा यासाठी समन्वय साधण्यात येणार आहे. जिल्हानिहाय व तालुकानिहाय प्रत्येक शाळेत डिजिटल रुम आणि रोबोटिक्स लॅब तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससाठी अखंड विजेची सुविधा प्राप्त करुन देणार, कोकणातील पाचही जिल्ह्यातील शाळा पुढील सहा वर्षांत टप्प्याटप्प्याने ग्रीन स्कूल करण्यात येईल. यासाठी शासकीय योजना आणि MEDHA च्या योजनांसाठी समन्वय साधून कोकणातील प्रत्येक मुलाला उत्तम शिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे. एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धा परिक्षांसाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय मार्गदर्शन केंद्र यात ग्रंथपाल, इंटरनेट सुविधा उपलब्ध करणार, अर्धवेळ ग्रंथपाल व प्रयोग शाळा सहाय्यकांना पूर्णवेळ सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती गती देणार, राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. हे व्हिजन डाॅक्युमेंट लागू करण्यासाठी येत्या २६ जुनला कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत निवडून देण्याची विनंती महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांनी ठाणे शहरातील विविध शाळा काॅलेज मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाशी संवाद साधताना केली.
यावेळी नौपाडा येथील सरस्वती स्कूल, शिवसमर्थ विद्यामंदिर, चरई येथील मावळी मंडळ,, श्रीरंग विद्यालय, माजीवडा येथील ग्रामीण शिक्षण संस्था हायस्कूल, वर्तकनगर येथील थिराणी हायस्कूल, घोडबंदर रोड येथील लोढा वर्ल्ड हायस्कूल या शाळांतील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांच्या सभांना मोठ्यासंख्येने उपस्थित राहून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी माजी नगरसेवक सुनेश जोशी, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, समाजसेवक डॉ. राजेश मढवी, साहित्यिक नरेंद्र पाठक, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे अध्यक्ष सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
०००००
