अशोक गायकवाड

*रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच २० जून रोजी होणाऱ्या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी अवघा रायगड सज्ज झाला आहे. १६७४ मध्ये ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी तिथीला रायगड किल्ल्यात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. मराठा साम्राज्याची पायाभरणी केल्यानंतर, त्यांनी शिस्तबद्ध सैन्य आणि सुसंघटित प्रशासकीय घटकांच्या मदतीने एक कार्यक्षम आणि प्रगतीशील प्रशासन प्रदान केले.

या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हा प्रशासनासह विविध शासकीय विभाग सुविधा पुरविण्यासाठी कार्यरत असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घागेंजिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी भेट देऊन पूर्वतयारीची पाहणी केली.*
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवेअप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढेनिवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होतेरायगड किल्ला व परिसरात होत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना सोई सुविधा निर्माण करताना आवश्यक काळजी घेण्यात आली आहे. वाहनांचे पार्किंगपिण्याचे पाणीआरोग्यस्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी विविध व्यवस्था करताना सोहळ्याच्या दिवशी शिवभक्तांसाठी बससेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्यात आली आहे. तसेच खासगी वाहनांच्या पार्किंग ठिकाणापासून देखील बससेवा उपलब्ध आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण गडाच्या चित्त दरवाजाजवळील वाय पॉईंटबसपार्किंग आणि गडावर विविध ठिकाणी उभारलेल्या पाच भव्य स्क्रीन वर करण्यात येणार असून शिवप्रेमी नागरिकाना या परिसरातून पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *