ज्ञानेश्वर माऊली पालखी स्वागत सोहळा
मुंबई : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने ६ जुलै २०२४ या दिवशी लोणंद (सातारा) येथे “माऊलीचे” दर्शन आणि वारकरी भक्तांना “लाडू वाटप” हा कार्यक्रम होणार आहे. तरी इच्छुकांनी या कार्यासाठी आर्थिक मदत करावी आणि ठरलेल्या दिवशी सोबत येऊन या पुण्यकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई. ही संस्था गेले १५ वर्षे लोणंद येथे वारकऱ्यांना लाडू, पाणी, बिस्कीट आदींचे वाटप वारकऱ्यांना केले जाते. यावेळी दहा हजार लाडू वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. अधिक माहितीसाठी संपर्क शंकर पवार ९९८७१९९५६५, श्रीधर फडतरे ८००७७७९०९५, श्री.नलावडे मामा ९८६९३९७६६५. धारावी विभाग :- महेश अंकुश-कवडे ९८६७०८०२०८ (पत्रकार, ग्राहक संरक्षण कक्ष, धारावी विधानसभा उपसंघटक).
०००००
