अनिल ठाणेकर
ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी व रविवारी, ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, विवीयाना माॅल समोर, ठाणे (पश्चिम) येथे ‘मोफत दाखले वाटप शिबीरा’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक २२ जून व रविवार, दिनांक २३ जून, २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये, ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, विवीयाना माॅल समोर, ठाणे (पश्चिम) येथे ‘मोफत दाखले वाटप शिबीरा’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये, 1.अधिवास (डोमेसाईल) दाखला, 2. रहिवासी दाखला, 3. उत्पन्नाचा दाखला आणि 4. ज्येष्ठ नागरिक दाखला हे दाखले उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये उपलब्ध होणारे दाखले आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. 1.अधिवास (डोमीसाईल) दाखल्यासाठी, १.आधार कार्ड, २. रेशन कार्ड / लाईट बिल / टॅक्स पावती, ३. शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला, ४. अर्जदाराचा १ फोटो, ५. जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर १० वर्षाचा रहिवासी पुरावा, त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असल्यास १० वर्षाचे प्रगती पुस्तक लागतील. 2. रहिवासी दाखल्यासाठी, १ आधार कार्ड, २.रेशन कार्ड / लाईट बिल / टॅक्स पावती, ३. शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला, ४. अर्जदाराचा १ फोटो, ५. जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर १५ वर्षाचा रहिवासी पुरावा, त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असल्यास १५ वर्षाचे प्रगती पुस्तक लागतील. 3. उत्पन्नाचा दाखल्यासाठी, १.अर्जदाराचे आधार कार्ड, २. पॅन कार्ड, ३. रेशन कार्ड, ४.मागील तीन महिन्याचे लाईट बिल, ५. शेजाऱ्यांचे आधार कार्ड, ६. अर्जदाराचे ४ फोटो, ७. बँकेचे पासबुक अपडेटे केलेले. ८. एक लाखाच्या आत दाखला हवा असल्यास नोटरी केलेले प्रतिज्ञा पत्र सादर करावे लागेल. 4. ज्येष्ठ नागरिक दाखल्यासाठी, १. आधार कार्ड, २. पॅन कार्ड, ३. रेशन कार्ड किंवा लाईट बिल लागेल. शिबिराच्या ठिकाणी तपासणीकरिता सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तरी या मोफत दाखले वाटप शिबीराचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, अशी विनंती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे.
00000
