ठाणे, शरीर, बुध्दी व मन याचा समतोल राखण्यासाठी, प्रत्येकानेच योग साधना रोज करण्याची गरज आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी त्याचा खूप उपयोग होईल असे प्रतिपादन आ. केळकर यांनी केले.
जागतिक योग दिनानिमित्त आमदार संजय केळकर यांनी अंबिका योग कुटीर, साकेत कॉम्प्लेक्स व ढोकाळी स्टेडियम येथे योग शिबीरात सहभाग घेऊन योग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.अंबिका योग कुटीर संस्था ६० वर्ष योग प्रशिक्षणात कार्यरत असून योग साधनेत संस्थेचे योगदान वागण्यासारखे आहे. श्री. संजय केळकर यांच्या ‘संस्कार’ संस्थेतर्फे श्री. दत्ता घाडगे व पंताजली संस्थेने योग दिन साजरा केला. यामध्ये ढोकाळी परिसरातील विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते.
0000
