मुंबई : पटियाला (पंजाब ) येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय इक्विप स्पर्धेत रायगडच्या युवा लिफ्टर गायत्री महेश बडेकर आणि अमृता ज्ञानेश्वर भगत या दोघींनी शानदार कामगिरी केली. सब ज्युनिअर महिला ४३ किलो वजनी गटात गायत्रीने स्कॉट, बेंच प्रेस व डेडलिफ्ट या प्रकारात २५५
किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले. त्याचबरोबर स्कॉट व डेडलीफ्ट या प्रकारात सुवर्णपदक मिळवले. कर्जत येथील  जे. व्हीं. आर. जिममध्ये गायत्री सराव करते. तिला हनुमंत खरात यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
तसेच राष्ट्रीय  ज्युनिअर इक्विप पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ४७ किलो वजनी गटात आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या अमृताने रौप्य पदक मिळवले. तिने स्कॉट, बेंचप्रेस आणि डेडलीफ्ट या प्रकारात एकूण ३१७.५ किलो वजन उचलले. या अगोदर राजस्थान येथे झालेल्या स्पर्धेत देखील अमृता ला रौप्य पदक मिळाले होते. पॉवर हाऊस क्लबचे (खोपोली)
संचालक विक्रांत गायकवाड आणि अरुण पाटकर या दोघांचे मार्गदर्शन तिला मिळत आहे. गायत्री आणि अमृताने मिळवलेल्या या यशाबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या दोघींचे खास अभिनंदन केले असून भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *